आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
‘सिंघम’मध्ये दमदार भूमिका करणार्या अजय देवगण ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक आहे.
1999 मध्ये संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ बनवण्याचा विचार केला होता. त्यावेळी ते ‘हम दिल दे चुके सनम’ बनवत होते. त्यात सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे यांनाच घेऊन ‘बाजीराव.’ बनवण्याचा विचार भन्साळी करत होते. मात्र 2002 मध्ये सलमान-ऐश्वर्यामध्ये वाद झाल्यानंतर भन्साळी यांनी करी ना, ऐश्वर्या, अभिषेक आणि राणी मुखर्जी यांच्या नावावर विचार केला. मात्र ते आपल्या दुसर्या चित्रपटात व्यग्र झाल्यामुळे त्यांनी बाजीरावला पुढे ढकलले. आता काही दिवसांपासून अजय देवगण ‘बाजीराव.’ करणार असल्याची चर्चा होती. अजयला विचारले असता तो म्हणाला की, या विषयावर संजयसोबत चर्चा सुरू आहे, अद्याप काही ठरलेले नाही, पण ही भूमिका करण्याची माझी खूप इच्छा आहे. म्हणजेच अजय नक्कीच बाजीराव होणार. सूत्रानुसार ‘रामलीला’च्या प्रदर्शनानंतर भन्साळी बाजीरावचे प्रीप्रॉडक्शन सुरू करणार आहेत. पुढच्या वर्षी चित्रीकरण सुरू होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.