Home »Top Story» Ajay Devgan Learn Dancing

अजय देवगण करणार डान्स

दिव्य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 10:47 AM IST

  • अजय देवगण करणार डान्स

अ‍ॅक्शन आणि कॉमेडी हीरोपर्यंतच मर्यादित न राहता अजय देवगण आता आपल्या आगामी सिनेमात चांगले नृत्य करताना दिसणार आहे.

अभिनेता अजय देवगणने गेल्या वर्षी ‘बोल बच्चन’ आणि ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमातून शंभर कोटींच्या क्लबमध्ये हजेरी लावली होती. वर्षभर तो यात गुंतला होता. थोडा विसावा मिळावा म्हणून तो अलीकडेच आपल्या कुटुंबासोबत नवे वर्ष साजरे करून परतला आहे. आल्यावर पुन्हा तो आपल्या कामात गुंतला आहे. यावर्षी त्याचे चार सिनेमे रिलीज होणार आहेत.

अजय सध्या साजिद खानच्या ‘हिम्मतवाला’ आणि प्रकाश झा यांचा ‘सत्याग्रह’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. याबरोबरच तो प्रभुदेवाचा आगामी सिनेमा आणि 'सिंघम' सिनेमाच्या सिक्वेलवरही काम करत आहे. या सिनेमात बाजीराव सिंघम आपल्याला नव्या रूपात दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अजय जोरदार नृत्यही करणार आहे. नृत्याचे धडे तो प्रभुदेवाकडून घेत आहे. अजय प्रभुदेवासोबत पहिल्यांदाच काम करत आहे. त्यामुळे तो फार उत्साहित आहे. पहिल्या सिनेमापेक्षा सिक्वेल 'सिंघम'मध्ये अधिक अ‍ॅक्शन आणि कॉमेडीसुद्धा पाहायला मिळणार असल्याचे अजय म्हणतो.

प्रभुदेवाचा आगामी सिनेमा दक्षिणेकडील चित्रपटाचा रिमेक असल्याचे बोलले जात होते. मात्र, अजयने ही गोष्टी नाकारली आहे. ‘बोल बच्चन’ आणि ‘सन ऑफ सरदार’ मध्ये थोडेफार नृत्य करणारा अजय ‘हिम्मतवाला’ मध्ये ही चांगले नृत्य करताना दिसणार आहे.

Next Article

Recommended