आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिंघम’ देईल वाघाविषयी माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅनिमल प्लॅनेट ‘व्हेअर टायगर्स रुल’ हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. एक महिन्यापर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रीय प्राण्याविषयीची माहिती देश आणि जगाला दाखवली जाणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकार अजय देवगण, बिपाशा बसू आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा अ‍ॅनिमल प्लॅनेटशी जुळलेले आहेत. वाघाचे अस्तित्व टिकवण्यासाठी या चॅनलने पुढाकार घेतला आहे.

राहुल जोहरी, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट डिस्कवरी नेटवर्क्‍स यांनी सांगितले की, वाघांचे संरक्षण हा राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरला आहे. या कार्यक्रमाने लोकांमध्ये वाघाविषयी आपुलकी आणि जागरूकता वाढेल. महिनाभर टीव्हीवर वाघच वाघ दिसणार आहेत.

अजय देवगण म्हणाला की, ‘वाघांची संख्या कमी होणे हा खरंच राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. आपल्या या राष्टीय खजिन्यावर अ‍ॅनिमल प्लेनेटने एक महिना कार्यक्रम दाखवण्याच्या जो निर्णय घेतला आहे, त्यावर मी खुश आहे.’

बिपाशा बसू म्हणाली की, ‘या वाहिनीने चांगला पुढाकार घेतला आहे. त्यामुळे लोकांनाही वाघांची किंमत कळेल’. नेमबाज अभिनव बिंद्रा म्हणाला की, ‘आपली जागा वाचवण्यासाठी वाघाला नेहमी माणसासोबत झुंझावे लागते. मला अभिमान वाटतोय की मी एका प्रजातीच्या संरक्षणासाठी जागरूकता वाढवणार्‍या वाहिनीशी जोडलो गेलो आहे.’ यात सिक्रेट लाइफ ऑफ द टायगर, ब्रोकन टे, रिटर्न ऑफ द टायगर, इंडिया किंगडम ऑफ द टायगर भाग दाखवले जातील.