आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार- कतरिना यांचा पुन्हा ‘कैफ’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘नमस्ते लंडन’, ‘वेलकम’ आणि ‘सिंग इज किंग’ या चित्रपटानंतर ‘तीस मार खाँ’ हा फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे रुपेरी पडद्यावर कतरिना कैफची जोडी अडीच वर्षापासून प्रेक्षकांना दिसली नव्हती. मात्र, लवकरच आता संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात हे दोघेही एकत्र दिसणार आहेत.

विपुल शहा यांनी सहा वर्षापूर्वी अक्षय आणि कतरिना यांना घेऊन ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावर्षी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश : धुमाकूळ घातला होता. तसेच यातील दोघांची केमिस्ट्री ही अशी जुळली होती की त्यानंतर अनेक दिग्दर्शकांनी त्यांना एकत्र घेऊन चित्रपट तयार करण्याचे ठरवले होते. मात्र, यातील काही जणांनाच यश आले. ‘वेलकम’ या चित्रपटात हे दोघे एकत्र आले. यामध्ये त्यांच्या जोडीला, अनिल कपूर, नाना पाटेकर आणि परेश रावल यांनीही साथ दिली.

यातील गाणी आणि एकूण कथेमुळे हा चित्रपटही यशस्वी ठरला. यानंतर दोघांनी पुन्हा ‘सिंग इज किंग’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या जोडीच्या यशाचा आलेख पाहून फराह खानने त्यांना घेऊन ‘तीस मार खाँ’ या चित्रपटात घेतले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली आपटी खाली. मात्र, यातील कतरिनाच्या ‘शीला की जवानी’ या गाण्याने रसिकांच्या मनावर राज्य केले. केवळ याच कारणामुळे या चित्रपटाची थोडी फार इज्जत शाबूत राहिली. अक्षय आणि कॅटची जोडी चांगली असल्याचे अनेकांचे मत होते. मात्र, गेल्या अडीच वर्षात त्यांच्या वाट्याला एकही चित्रपट आला नाही. आता भन्साळीच्या चित्रपटातून दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा अपेक्षा ठेवायला हरकत नाही.