आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay Kumar Became Singer For Upcoming Movie Special 26

खिलाडी अक्षय झाला गायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमार आता गायकाच्या रुपात आपल्यासमोर येत आहे. आगामी चित्रपट 'स्पेशल26' मध्ये अक्षयने एक गाणे स्वतःच्या आवाजात स्वरबद्ध केले आहे.

'मुझमें तू है' हे गाणे अक्षयने स्वरबद्ध केले. चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडेंची अक्षयने चित्रपटात गाणे गाण्याची इच्छा सुरुवातीपासूनच होती. चित्रपटाचे संगीतकार एम.एम.करीम आणि नीरज पांडे हे दोघे जवळपास एक महिना अक्षयची गाणे गाण्यासाठी मनधरणी करीत होते. शेवटी अक्षय गाण्यासाठी तयार झाला.

अक्षयने गाणे गाण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच गाण्याची ट्रेनिंग सुरु केली. जवळपास पाच महिने अक्षयने गाण्याचा अभ्यास केला. त्यामुळेच हे गाणे अक्षय चांगल्या पद्धतीने गाऊ शकला.