आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयसोबत बँकॉकला जाईल स्पेशल डॉग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअक्षय कुमार ‘द एन्टरटेन्मेंट’ सिनेमाच्या शूटिंगसाठी बँकॉकला जात आहे. अनेक सिनेमाचे शूटिंग बँकॉकमध्ये करणार्‍या अक्षयला या जागेचे विशेष प्रेम आहे. सिनेमातील कथेचा क्लायमेक्स हीरोला बँकॉकला घेऊन येतो. एक जुलैपासून सुरू होणार्‍या शूटिंगसाठी अक्षयसोबत सिनेमातील अभिनेत्री तमन्ना भाटियासुद्धा जात आहे. या दोघांसोबत एक को-स्टारदेखील जात आहे. तो को-स्टार दुसरा कोणी नसून एक छोटा डॉगी आहे. सिनेमात या डॉगीची खास भूमिका आहे. अक्षयने स्वत: डॉगीसाठी खास व्यवस्था करण्याचा सल्ला प्रॉडक्शन स्टाफला दिला आहे.