आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खिलाडी’ म्हणणार पुन्हा ‘नमस्ते लंडन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार ‘नमस्ते लंडन’च्या सिक्वेलमध्ये काम करणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विपुल शाह ‘नमस्ते लंडन’ चा सिक्वेल बनवत आहेत. यात अक्षयकुमार मुख्य भूमिका साकारणार आहे. सिनेमाची स्क्रिप्ट विपुल शाहने तयार केली आहे आणि ते लवकरच यावर काम सुरू करणार आहेत. मात्र सिनेमाची कथा ‘नमस्ते लंडन’ चा पुढचा भाग नसून नवी कथा असणार आहे. सिक्वेल प्रेम त्रिकोणावर आधारित असेल. ज्यात एक अभिनेता आणि दोन नायिका असतील. मात्र याविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या विपुल शाह दिग्दर्शित ‘नमस्ते लंडन’मध्ये अक्षयकुमार, कतरिना कैफ आणि ऋषी कपूरने मुख्य भूमिका केल्या होत्या.