आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयची रेकार्डब्रेक कमाई, 20 दिवसांचे घेणार 45 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसिनेमासाठी कलाकारांचे गलेलट्ठ मानधन घेणे काही नवीन गोष्ट नाही. भारतात सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत कलाकारांच्या मानधनात खूप वाढ झाली आहे. एका सामान्य माणसाच्या आयुष्यभराची कमाई या तार्‍यांच्या एका सिनेमाची कमाई असते.

आता बातमी आहे की, ‘खिलाडी नंबर 1’ म्हणजेच अक्षय कुमार रूमा जाफरीच्या आगामी सिनेमात सर्वात जास्त मानधन घेणार आहे. ‘शौकीन’ सिनेमासाठी तो 20 दिवसांचे 45 कोटी रुपये घेणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात तो मिथुन चक्रवर्तीची भूमिका साकारणार आहे. अक्षय आधी हा सिनेमा करण्यास तयार नव्हता, नंतर आपल्या शेड्यूलमधून फक्त 20 दिवस देण्यास तयार झाला.

1981मध्ये प्रदर्शित झालेला ‘शौकीन’ सिनेमा बासू चटर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. यात तीन ज्येष्ठांची कथा आहे, जे एका मुलीला पटवण्यासाठी नको ते उद्योग करतात. ओरिजनल सिनेमात उत्पल दत्त, ए.के. हंगल, अशोक कुमार आणि मिथुन चक्रवर्तीने काम केले होते. ‘शौकीन’च्या रिमेकमध्ये परेश रावल, अनुपम खेर आणि अक्षय कुमार काम करणार आहेत.