Home »Top Story» Akshay Kumar In Special Chabbis

अक्षयकुमारचा दमदार ‘स्पेशल छब्बीस’

चंद्रकांत शिंदे | Jan 07, 2013, 14:11 PM IST

मुंबई - 1987 मध्ये झवेरी बाजार येथील त्रिभुवनदास भीमजी झवेरी यांच्या शोरूमवर दिवसाढवळ्या घातलेल्या दरोड्याची कथा आता ‘स्पेशल छब्बीस’च्या रूपात पडद्यावर येत आहे. या सिनेमात तोतया पोलिस अधिकार्‍याची भूमिका अक्षय कुमार करत असून सिनेमाचे दिग्दर्शन नीरज पांडे आहेत. येत्या 8 फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नटवरलालच्याही करामती असल्याने हा सिनेमा आपल्याला दाखवावा त्यानंतरच प्रदर्शित करावा, असे पत्र कुख्यात नटवरलालच्या नातेवाइकांनी निर्मिती संस्थेला पाठवले आहे.

आजवर अनेक गुन्हेगारी विश्वावर अनेक सिनेमे आले, परंतु त्रिभुवनदास झवेरीच्या शोरूमवर घालण्यात आलेल्या अनोख्या दरोड्यावर सिनेमा बनवावा, असे कोणाला वाटले नव्हते. नीरज पांडेने सांगितले की, 'अ वेडनस्डे'नंतर मला अशाच प्रकारची चित्तथरारक कथा पडद्यावर मांडायची होती. कथेच्या शोधात असताना मला झवेरीवरील दरोड्याची बातमी कळली. मी त्या घटनेचे सगळी माहिती मिळवली. एकता कपूरला जेव्हा कथा ऐकवून सिनेमा बनवण्याची इच्छा असल्याचे सांगितले तेव्हा ती लगेच तयार झाली. या सिनेमात अक्षय कुमार अजय सिंग नावाच्या ठगाची भूमिका साकारत आहे जो अनेकांना टोप्या घालतो. त्यानंतर तो झवेरी शोरूमवर कसा दरोडा घालतो ते आम्ही यात दाखवले आहे. कुख्यात ठग नटवरलाल याच्या जीवनावरील आधारित काही दृश्ये आणि टीबीझेडचा दरोडा याचे आम्ही बेमालूम मिश्रण या सिनेमात केले आहे. सिनेमाचे चित्रीकरण दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत केल्याचे त्यांनी सांगितले.

Next Article

Recommended