आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारमिनारवर अक्षयची ‘बॉस’गिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आपल्या आगामी 'बॉस' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याचाच एक भाग म्हणून तो हैदराबादमध्ये गेला होता. येथे चित्रपटाला प्रमोट करण्याची आणि चाहत्यांना भेटण्याची अक्षयने नवी पद्धत काढली. तो शहराच्या प्रसिद्ध चारमिनारवर पोहोचला.
16व्या शतकातील या ऐतिहासिक वास्तूवर अक्षयने या शैलीत सगळ्या चाहत्यांना अभिवादन केले. अँटोनी डिसूजा दिग्दर्शित हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयबरोबरच अदिती राव हैदरी, मिथुन चक्रवर्ती, रोनित रॉय, शिव पंडित मुख्य भूमिकेत आहेत. हा मल्याळम चित्रपट ‘पोकिरी राजा’चा रिमेक आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा हैदराबादमध्ये पोहोचलेल्या अक्षयची ही खास छायाचित्रे...