आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमार आणि श्रुती हसनच्या 'गब्बर' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय कुमार आणि श्रुती हसन यांच्या आगामी 'गब्बर' सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या चित्रीकरणादरम्यानची काही खास छायाचित्रे आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अलीकडेच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शनमध्ये हा सिनेमा तयार होतोय.
शुटिंग सेटवर श्रुती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये आकर्षक दिसत आहे. तर दुसरीकडे अक्षय रफ लूकमध्ये दिसतोय. त्याची दाढी बरीच वाढलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने सोशल नेटवर्किंग साईट्सवर या सिनेमातील आपला फस्ट लूक शेअर केला होता.
या सिनेमात अक्षय आणि श्रुतीसह सोनू सूद, प्रकाश राज आणि निकेतन धीर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राधाकृष्ण जगरलमुडी या सिनेमाचे दिग्दर्शक तर संजय लीला भन्साळी निर्माते आहेत. यावर्षी 25 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा गब्बरच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणाची ही खास छायाचित्रे..