आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा 'वन्स अपॉन...'मधील सोनाक्षी-अक्षयच्या PASSIONATE प्रेमाची झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' या सिनेमाचा सिक्वेल 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अगेन' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाप्रमाणेच त्यातील गाण्याचाही सिक्वेल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आजवर प्रेक्षकांनी सिनेमांचे सिक्वेल बघितले आहेत, मात्र आता पहिल्यांदाच गाण्याचा सिक्वेल त्यांना बघायला मिळणार आहे.

'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' या सिनेमातील 'पी लूं...' या सुपरहिट गाण्याचा सिक्वेल 'ये तूने क्या किया...' हे आहे. हे गाणे लवकरच रिलीज होणार आहे. 'ये तूने क्या किया...' हे एक सूफी गाणे असून त्याचा राग 'पी लूं...' या गाण्याचाच आहे. या गाण्याला प्रीतमने संगीतबद्ध केले असून जावेद बाशिरने गायले आहे.
सिनेमाच्या पहिल्या भागात हे गाणे इमरान हाश्मी आणि प्राची देसाईवर चित्रीत करण्यात आले होते. तर सिक्वेलमध्ये हे गाणे अक्षय आणि सोनाक्षीवर चित्रीत करण्यात आले आहे.

'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अगेन' या सिनेमात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाबरोबर सोनाली बेंद्रे, इरफान खान मेन लीडमध्ये झळकणार आहेत. हे सर्व कलाकार सिनेमात वेगळ्या रुपात दिसणार आहेत.
मिलन लुथरिया दिग्दर्शित हा सिनेमा एकता कपूरने प्रोड्युस केला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोनाक्षी-अक्षयवर चित्रीत झालेल्या गाण्याची एक खास झलक..