अभिनेता अक्षय कुमार लवकरच 'स्पेशल छब्बीस' या सिनेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात अक्षय कुमार आपल्याला 26 लोकांच्या टीमबरोबर दिसणार आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून 26 लोकांचा समूह एका सराफा दुकानात छापा मारुन लाखोचा ऐवज कसा लंपास करतो याची कथा या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अक्षयने सांगितले की, ''ज्याप्रमाणे सिनेमात मी 26 लोकांचा समूह तयार केला आहे, त्याचप्रमाणे खासगी आयुष्यातदेखील मला 26 लोकांचा समूह तयार करायचा आहे. या 26 लोकांच्या मदतीने मला देशासाठी एक चांगले काम हाती घ्यायचे आहे.''