आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akshay & Twinkle Khanna\'s Obscene Behaviour Can Land Them In Jail!

अश्लील कृत्याबद्दल अक्षय-ट्विंकल अडचणीत, अक्षय तुरुंगात जाणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 2009 मध्ये मुंबईत आयोजित करण्यात आलेला लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक दरम्यान अक्षय कुमारने केलेले अश्लीलकृत्य तुमच्या लक्षात असेलच. आता आपल्या या अश्लील कृत्याबद्दल अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना अडचणीत सापडले आहेत.

फॅशन शोमध्ये अक्षयने एका जीन्सची जाहिरात करत ट्विंकलकडून रॅम्पवर पँटची झीप लावून घेतली होती. एका फॅशन शोमध्ये अश्लीलता दर्शवल्याप्रकरणी अक्षय आणि ट्विंकल यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना दिले. या शोच्या आयोजकांना मात्र या खटल्यातून वगळण्यात आलंय.