आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt And Arjun Kapoor’S Romantic Holi In 2 States

‘2 स्टेट्स’मध्ये आलिया आणि अर्जुनची रोमँटिक होळी, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर आपल्या आगामी '2 स्टेट्स' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सिनेमात हे दोघे मेन लीडमध्ये असून रुपेरी पडद्यावर या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. केवळ पडद्यावरच नव्हे तर रिअल लाइफमध्येसुद्धा या दोघांची केमिस्ट्री चर्चेत आहे. सुत्रांच्या मते, हे दोघे सध्या डेटिंग करत आहे. आता हे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत, की केवळ सिनेमापुरता हा पब्लिसिटी स्टंट आहे, हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल.

असो, देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पडद्यावर आलिया आणि अर्जुनसुद्धा होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. अलीकडेच या दोघांची होळी खेळतानाची काही छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे '2 स्टेट्स'मधील होळी सीनची आहेत. रोमँटिक धाटणीचा हा सिनेमा चेतन भगत यांच्या गाजलेल्या '2 स्टेट्स' या कादंबरीवर आधारित आहे.

अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा सिनेमा करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांची निर्मिती आहे. आलिया आणि अर्जुनसह रोनित रॉय, अमृता सिंह, रेवती आणि अंकित चित्राल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. येत्या 18 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा आलिया-अर्जुनची होळीच्या रंगात रंगलेली छायाचित्रे...