आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt, Arjun Kapoor To Get Engaged On Feb 28

\'2 स्टेट्स\'चे प्रमोशन: 28 फेब्रुवारीला होणार आलिया-अर्जुनचा साखरपुडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश भट्ट यांची धाकटी मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा साखरपुडा होणारा आहे. विश्वास बसत नाहीये ना, पण हे खर आहे. आलियाने स्वत: या साखरपुड्यासाठी जवळच्या मित्रांना आणि नातेवाईकांना आमंत्रण दिले. तुम्हीच अंदाज बांधा कोण असेल तो भाग्यवान ज्याच्या नशिबात आलियासारखी सुंदर तरूणी आली.
चला आम्हीच तुम्हाला सांगतो, आलिया भट्टचा दुसरे-तिसरे कुणी नाही तर 'इश्कजादे' अर्जुन कपूरसोबत साखरपुडा होणार आहे. अहो, पण आम्ही तुम्हाला हे त्यांच्या ख-या आयुष्यातील नाही तर पदड्यावरील आयुष्याबद्दल सांगत आहोत. झाले असे, की '2 स्टेट्स' सिनेमाचे प्रमोशन करण्याची ही वेगळी पध्दत आहे. दोघांचा साखरपुडा करून या सिनेमाचे प्रमोशन केले जाणारा आहे.
आलियाने तिच्या साखरपुड्याचे आमंत्रण टि्वट करून दिले आहे. कार्यक्रमाचा वेन्यू यूट्यूब, टि्वटर, फेसबुक आणि सोशल नेटवर्किंगवर उपलब्ध आहे. कार्डसोबत शगुनच्या स्वरुपात सिनेमा रिलीज होण्याच्या दिवशीचे तिकीटदेखील दिले जाणार आहे. यांच्या साखरपुड्याची तारीख 28 फेब्रुवारी 2014 ठेवली आहे. आलियाने टि्वट केले आहे, 'आय अ‍ॅम एन्गेज!!!;)'
सिनेमांच्या निर्मात्यांनी सिनेमाचे प्रमोशन करण्याचा हा नवीन फंडा शोधला आहे आणि तो त्यांच्या फायदाचा ठरत आहे. आमंत्रणात सांगितले आहे, 'तुम्हाला क्रिश मल्होत्रा (आर्जुन कपूर) आणि अनन्या स्वामीनाधन (आलिया भट्ट) यांच्या साखरपुड्यासाठी (2 स्टेट्सच्या प्रोमो लाँचसाठी) आमंत्रित करण्यात येत आहे.'
काही दिवसांपूर्वीच आलियाने '2 स्टेट्स'विषयी सांगितले होते, 'हो, मी प्रोमोची वाट बघत आहे. परंतु प्रमोटची नाही.' सिनेमाची कहाणी दोन आयआयएम पदवीधर तरूणांची आहे, जे शिक्षण घेताना एकमेकांच्या प्रेमात प़डतात. दोघे जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांना जाणवते, की त्यांच्या लग्नात किती समस्या उभ्या राहू शकतात. त्यांचा अंतरजातीय विवाह असल्याने त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो.
वेगळ्या आणि रंजक थीमवर बनलेल्या या '2 स्टेट्स' लव्ह स्टोरीचे दिग्दर्शन अभिषेक वर्मनने केले आहे. ज्याला मोशन पिक्चरने करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत निर्मित केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा आलियाने काय टि्वट करून तिच्या चाहत्यांना साखरपुड्याचे आमंत्रण दिले आहे...