आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt Breaks Her Silence On Affair With Arjun Kapoor

अर्जुनचे स्थान महत्त्वाचे - अलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्जुन कपूरचे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे असे स्थान असल्याचे अभिनेत्री अलिया भट्टने म्हटले आहे. ‘हायवे’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर यशाचे शिक्कमोर्तब केलेली अलिया अर्जुनबरोबर 2 स्टेट्स या चित्रपटात झळकणार आहे.
अर्जुन अत्यंत मजेशीर व्यक्ती असून त्याला विनोदाचे अंगही चांगले आहे. तो माझा चांगला मित्र बनला असून माझ्या जीवनातही त्याचे महत्त्वाचे स्थान असल्याचे आलियाने सांगितले. अलिया भट्ट हिचे वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांच्याबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा होत्या; पण अशा चर्चांचा काहीही परिणाम होत नसल्याचे अलिया म्हणाली. ‘यातले काहीही खरे नाही आणि खरे असेल तर मला का वाईट वाटावे. खासगी आयुष्याबाबत मी कोणाशीही बोलणार नाही,’ अशा शब्दांत अलियाने प्रतिक्रिया दिली.