आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अरे हे काय... अशी रस्त्यात का बसलीय आलिया भट्ट ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरे आलिया भट्ट अशी रस्त्याच्या मध्ये का बसलीय, याचाच विचार तुम्ही करतायत ना... चला तर मग आम्ही तुम्हाला यामागचे कारण काय ते सांगतो. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाला मिळालेले यश बरेच दिवस
साजरे केल्यानंतर आता अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या नवीन प्रोजेक्टच्या कामाला लागली आहे. इम्तियाज अलीच्या आगामी 'हायवे' या सिनेमात आलिया भट्ट मेन लीडमध्ये झळकणार आहे. याच सिनेमातील एका दृश्यातील आलियाचे हे छायाचित्र आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आलिया राजस्थान, हरियाणापासून ते हिमाचल, पंजाब आणि काश्मिरचा दौरा करतेय.
इम्तियाज अलीच्या 'जब वी मेट'मधून करीना कपूर आणि 'लव्ह आज कल'मधून दीपिका पदुकोणने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता आलिया भट्ट प्रेक्षकांना एन्टरटेन करायला येत आहे. या सिनेमात आलिया भट्टबरोबर रणदीप हुड्डा मेन लीडमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा 'हायवे' सिनेमाच्या ऑनलोकेशन शुटिंगची खास छायाचित्रे...