आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aliya Bhatt And Arjun Kapoor Romance In Two States

'2स्टेट्स'मध्ये आलिया-अर्जुनचा रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बोल्ड आणि ग्लॅमरस रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आलिया भट्ट आता तामिळ मुलीच्या भूमिकेतून आपल्या भेटीला येत आहे. चेतन भगतच्या '2स्टेट्स' या कादंबरीवर आधारित सिनेमात आलिया झळकणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात आपल्याला दिसणार आहे 'इश्कजादे' फेम अर्जुन कपूर. अर्जुन या सिनेमात पंजाबी मुलाची भूमिका साकारणार आहे.

ही एक धम्माल प्रेमकथा आहे. भारतातील दोन वेगवेगळ्या राज्यात वाढलेले पंजाबी मुलगा आणि तमिळ मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यानंतर ते आपल्या आईवडिलांना त्यांच्या लग्नासाठी कसे तयार करतात हे आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा सिनेमा साजिद नडियाडवाला प्रोड्युस करणार आहेत.

अर्जुन या सिनेमात क्रिश मल्होत्रा या पंजाबी मुलाच्या भूमिकेत तर आलिया तमिळ ब्राह्मण अनन्या स्वामिनाथनच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आलिया खास तामिळचे धडे गिरवतेय.
चला तर '2 स्टेट्स'मधील आलिया आणि अर्जुनची फ्रेश केमिस्ट्री प्रेक्षकांना भावणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.