आकर्षक रोषणाईने सजलेला रॅम्प आणि त्यावर वेडिंग कलेक्शन सादर करणा-या एकापेक्षा एक सुंदर मॉडेल आणि त्याच रॅम्पवर नखरे दाखवणारी बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट आणि बेबी ताशबीह. ख्रिसमसच्या रात्री राजधानीच्या ईरोज इंटरकॉन्टिनेंटल या हॉटेलमध्ये बेबी ताशबीहच्या वाढदिसाच्या दिवशी एक खास फॅशन आयोजित केला होता. डिजायनर कविता आणि मीनू यांनी वेडिंग कलेक्शन लॉन्च करण्यासाठी 'ख्वाब-2013' हा फॅशन शो आयोजित केला होता. या फॅशन शोमध्येअसिया भट्टने बेबी ताशबीहासोबत रॅम्प वॉक करून सर्वांची मनं जिंकली. कविता आणि मीनू यांनी वेडिंग कलेक्शनमध्ये मुघलाई वेशभूषेचे आकर्षक सादरिकरण केलं. या वेशभूषेच्या ड्रेसेसवर लाल मखमली आणि रेशमाचा वापर केला होते. निळे, काळे रंगांनी क्रिस्टल आणि एम्ब्रॉयडरीचे उत्कृष्ट काम केलेलं होतं. बेबी ताशबीहसोबत जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा मात्र ही मुघलाई वेशभूष आणखीच आर्षक दिसायला लागली होती. शो संपल्यानंतर अलियाने बेबीच्या बर्थडेचा केक कापला आणि बेबीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा आलिया आणि बेबी तशबीहाची रॅम्पवरील काही खास छायाचित्रे