आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हंप्टी शर्मा की दुल्हनिया\'ची आलिया अंबालामध्ये, जाणून घ्या 4 लोकांनी का पिली 45 कप कॉफी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द सिनेमा निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांचा 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया' या आगामी सिनेमाचे काही सीन्स अम्बाला येथे चित्रीत करण्यात आले आहेत. तरुणांच्या मनावर राज करणारी अभिनेत्री आलिय भट्ट आणि नवोदीत स्टार वरुण धवन यांच्यासोबत तीन सीन चित्रीत करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून सदर बाजारात शुटिंग बघणा-यांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येकाला आपल्या आवडत्या स्टार्सची एक झलक बघण्याची आतुरता लागली होता.
काही अशाप्रकारे झाली शुटिंग
11 जुलैला रिलीज होणारा 'हंप्टी शर्मा की दुल्हनिया'चा पहिला सीन कँट बस, अड्ड्यावर चित्रीत केले आहे. सीनमध्ये हीरो हंप्टी (वरुण धवन) बसमधून उतरून ऑटोरिक्शामधून जातो. इथेसुध्दा लोकांमध्ये शुटिंग बघण्याचा उत्साह बघण्यास मिळाला. जवळपास साडे सात वाजेच्या सुमारास सिनेमाची अभिनेत्री काव्या (आलिया भट्ट) सदर बाजारमध्ये दिसली. तिथे ती सिनेमाच्या टीमसोबत कॉफी पिताना सीन चित्रीत करताना दिसली. इथेही लोकांनी शुटिंग बघण्यासाठी मोठी झुंबड केली होती. साडे अकरा वाजता सीन ओके झाला. सिनेमाचा शेवटाचा सीन सदर बाजारच्या एका हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. त्यामध्ये आलिया तिच्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसली. दुपारी जवळपास अडीच वाजता शुटिंगचे पॅकअप झाले.
अनेक सीन झाले रिटेक
सदर बाजारमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या सीनमध्ये आलिया भट्ट आणि तिचे तीन को-स्टार कलाकारांनी तब्बल 45 कॉफी पिल्या. शॉट रिटेक झाल्याने कलाकारांना कॉफीचा आधार घ्यावा लागला. सीन ओके होताच आलिया हॉटेलकडे रवाना झाली. दुकानदाराने सांगितेल, की सकाळपासून शुटिंग चालू असल्याने सामान्य ग्राहक त्यांच्या दुकानात आलेच नाहीत. सिनेमाच्या क्रू-मेंबरने लोकांना आलियापासून दुरच ठेवले.
सिनेमात अम्बालाची रहिवाशी आहे आलिया
टिम्मी प्रॉडक्शनचे लाइन निर्माता गगनदीप सिंह यांनी सांगितले, की सिनमात लव्ह आणि रोमान्स दोन्ही भरपूर आहे. त्यामध्ये आलिया भट्टला अम्बालाची एक कॉलेज विद्यार्थीनीच्या रुपात दाखवले आहे. नंतर तिला सिनेमाचा नायक वरुण धवनवर प्रेम होते. हळू-हळू त्यांचे प्रेम वाढत जाते. गगनने सांगितले, की सिनेमाचे काही सीन चंडीगढ आणि दिल्लीमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.
एकिकडे लोकांमध्ये शुटिंग बघण्याचा उत्साह बघायला मिळाल तिथेच दुस-या ठिकाणी नाराजगीसुध्दा पाहायला मिळाली. कारण तेथील काही दुकानदारांच्या मते त्या दिवशी त्यांचा कमाईवर परिणाम झाला आहे. शुटिंगमुळे सदर बाजारातील मुख्य रस्ते काही तास बंद ठेवण्यात आले होते. जवळपास 40 पोलिस कॉन्स्टेबलने रस्ता अडवलेला होता. सदर बाजार ट्रेडर्स असोशिएशनचे प्रमुख अजय गुलाटी यांनी नाराजी व्यक्त करून सांगितले, की जवळपास सहा तास सदर बाजारच्या दुकानादारांना आणि ये-जा करणा-या लोकांना अनेक अडचणी आल्या. प्रशासनाला शुटिंगपूर्वीच बाजारच्या दुकानदारांना माहिती द्यायला हवी होती. शुटिंगमुळे इथे खूप ट्रॅफिक जाम झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अम्बालामध्ये शुटिंग दरम्यान आलिया भट्टची काही खास छायाचित्रे...