आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दिवंगत अभिनेत्री जिया खान हिच्या शोकसभेला अभिनेता आमिर खान, दीपिका पदुकोन यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या वेळी रणबीर कपूर, संजय कपूर, प्रतीक बब्बर, नगमा, ऊर्वशी ढोकलिया यांनीही तिच्या राहत्या घरी भेट दिली. या वेळी आमिर खानच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर इतरांनीही आपल्या भावनांना वाट करून जियाच्या आठवणींना उजाळा दिला. जियाने 3 जून रोजी गळफास घेऊन
आत्महत्या केली होती.
घटनेच्या दिवशी तिने अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याला शेवटचा फोन केला होता. शनिवारी जियाच्या कुटुंबीयांना तिने लिहिलेले सहा पानी पत्र सापडले असून यात तिने आपल्या तणावपूर्ण प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. जियाचे कुटुंबीय लवकरच हे पोलिसांना देणार आहेत. दरम्यान, सापडलेले पत्र जियानेच लिहिले का याचा तपास पोलिस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जियाने 2007 मध्ये रामगोपाल वर्मा यांच्या ‘नि:शब्द’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पर्दापण केले होते.
त्या वेळी तिच्या बोल्ड अंदाजाचे सर्वांनी कौतुक केले होते. तिला यासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकनही मिळाले होते. यानंतर मात्र, तिला आमिर खानच्या ‘गजनी’ आणि ‘हाऊसफुल’ चित्रपटांशिवाय
काम मिळाले नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.