आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Girls Were Crazy For Bollywood Superstar Rajesh Khanna

राजेश खन्नाच्या प्रेमात पडल्या होत्या तरुणी, रक्ताने लिहत होत्या प्रेमपत्र...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड दिग्गज सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1942मध्ये झाला होता. परंतु राजेशजी आता आपल्यात नाहीये. 18 जुलै 2012ला त्याचं निधन झाल होतं. आजसुध्दा त्यांचे चाहते त्यांची आठवण काढतात. राजेश खन्ना अभिनेता त्याचबरोबर दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक हिंदी सिनेमे तयार केले आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांनी राजकिय क्षेत्रातसुध्दा पाय ठेवला होता. ते नवी दिल्ली लोकसभेचे 5 वर्षापर्यंत काँग्रेस पार्टीचे संसद होते. त्यानंतर त्यांनी राजकारण सोडून दिलं.
राजेश खन्नाने बरेच हिट सिनेमे दिले. त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी तीनवेळेस फिल्म फेयर पुरस्कार मिळाला होता. बंगाल फिल्म जर्नालिस्ट एसोसिएशनव्दारा हिंदी सिनेमाचे सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार चारवेळेस त्यांना मिळाला. 2005मध्ये फिल्मफेयरचा लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड दिला होता.
जाणून घेऊ सुपरस्टार राजेश खन्नाच्या जिवनातील काही रंजक गोष्टी...