आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी ऑलराउंडर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 च्या दशकात रूपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री जुही चावला बर्‍याच दिवसांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. ‘मैं कृष्णा हूं’ या मुलांच्या चित्रपटात जुही दिसणार आहे.

जुहीने या आधीही मुलांच्या चित्रपटात ‘भूतनाथ’ मध्ये बंकूच्या आईची भूमिका केली होती. जुही म्हणाली की, कॅटरिना, करिनाला मुले त्यांच्या नावाने ओळखतात. मात्र, मला बंकूची आई म्हणून ओळखतात. आता ‘मैं कृष्णा हूं’ या चित्रपटात मुले मला ‘कांता बेन’ च्या नावाने ओळखतील. जुहीने या चित्रपटात एका अनाथालय चालवणार्‍या कांताबेनची भूमिका केली आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.