आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alman Khan And Shahrukh Khan Celebrated Diwali Together

सलमानच्या घरी दिवाळी जोरात, पार्टीत दिसून आली गौरी खान, पाहा PICS...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीनिमित्त पार्टी देण्याचे व आपल्या घरी मेहमानांना बोलवायचे ही बॉलिवूडची पद्धतच झाली आहे. जवळजवळ सर्वच बड्या कलाकारांनी दिवाळीच्या निमित्ताने पार्टी ठेवल्या होत्या. अक्षयकुमार, एकता कपूर, आमिर खान, बिग बी यांनी जोरदार पार्ट्या केल्यानंतर या स्पर्धेत आता सलमान खान कसा मागे राहील. तर त्यानेही आपल्या परिवारासह जोरदार पार्टी साजरी केली व बॉलिवूडकरांना आमंत्रित केले होते.
या पार्टीत खान कुटुंबियांच्या जळवच्या लोकांशिवाय इंडस्ट्रीतील त्यांची मित्रमंडळी पोहोचली होती. सलमान खान आणि सोहेल खानच्या या पार्टीत अनेक कलाकार दिसून आले पण बातमी अशी आहे की या पार्टीत शाहरूख खानसुद्धा सलमानच्या घरी आला होता.
आता ही बातमी खरी की खोटी हे माहित नाही पण या पार्टीत शाहरूख खानची पत्नी गौरी खान मात्र जरूर दिसून आली. जर गौरीसोबत शाहरूख आला असेल तर आपण नक्की म्हणू शकतो सलमान आणि शाहरूख खान यांनी यंदाची दिवाळी एकत्र साजरी केली.
विशेष म्हणजे, या वर्षी झालेल्या एका इफ्तार पार्टीत दोघांनी एकमेंकानी गळाभेट घेत आपल्यात आता कटुता राहिली नसल्याचे संकेत दिले होते. सुमारे पाच वर्षापूर्वी कतरिनाच्या बर्थ-डे पार्टीदरम्यान दोघांत कशावरून तरी भांडण झाले होते. ज्यानंतर हे दोघे एकमेंकाकडे पाहणे देखील पसंत करीत नव्हते.
पुढे पाहा, सलमान खानच्या घरी झालेल्या पार्टीतील खास छायाचित्रे....