आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांना चकित करायला आवडते- अल्ताफ राजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक‘तुम तो ठहरे परदेशी’ या गाण्याचा गायक तुम्हाला आठवतोय का? तोच तो अल्ताफ राजा त्याने गायलेले हे गीत त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाले होते. 20 वर्षांनंतर तो पुन्हा परतला आहे.

इतके दिवस पडद्याआड राहिलेला अल्ताफ आता इम्रान हाशमीसोबत ‘घनचक्कर’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील ‘झुलू राम’ गाण्यात तो इम्रानसोबत नृत्य करतानाही दिसणार आहे. हे गाणे त्याने गायले आहे.

इतके दिवस कुठे होता यावर तो हसून म्हणाला की, मी कुठेच गेलो नव्हतो तर बॉलिवूडच्या अवतीभोवतीच फिरत होतो. माझे राहणीमान साधेच आहे. त्यामुळे मला जास्त खर्च लागत नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रम करत होतो आणि गाणी लिहित होतो. इतक्या वर्षांनंतर लोकांसमोर येणे एक खूप चांगला अनुभव आहे. खरं तर लोकांना चकित करणे मला आवडते. ‘झुलू राम’ गाण्यात माझी नवी स्टाइल दिसणार आहे. नाविन्य लोकांना आवडत असल्यामुळे मी नव्या शैलीत आलो आहे. लोकांना हे गाणे आणि माझी शैली नक्कीच आवडेल याचा मला खात्री असल्याचे अल्ताफ म्हणाला.

अमित त्रिवेदीने कंपोज केलेले हे गाणे यूट्यूबवर लोड करण्यात आले आहे. अल्ताफ राजा आणि इम्रान हाश्मी दिसत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1.4 लाख लोकांनी पसंती दिली आहे.