आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: ओळखा पाहू, लिप्स्टिक - चष्मा लावून कोण आली ही ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान जे काही करेल त्याची चर्चा नक्कीच होते. एका जाहिरातीसाठी आमिरने आता महिलेचे रुप घेतले आहे. या जाहिरातीत तो सोनिया नावाच्या महिलेची भूमिका करणार आहे. प्रसिध्द मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने आमिरला हा नवा लूक दिला आहे. यात तो काळेभोर खांद्यावर रुळणारे केस, चष्मा, आणि गुलाबी सुटला मॅच करणारी लिप्स्टिक लावलेला दिसेल.

वेगवेगळ्या रुपात समोर येणे हे आमिरचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. याआधीही त्याने महिलेची भूमिका केली होती. २००८ मध्ये टाटा स्कायच्या जाहिरातमध्ये तो महिलेच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या चाहत्यांनाही त्याची ही भूमिका आवडली होती. जाहिरातींशिवय चित्रपटातूनही आमिरने महिलेची भूमिका केलेली आहे. 'बाजी' या चित्रपटात त्याने महिलांचे कपडे घालून चक्क आयटम नंबर केला होता. हे फनी साँगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.