आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SNAPPED: पब्लिसिटीसाठी अमिषाने पुन्हा वापरला जुना फंडा ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडक फॅशन सेन्ससाठी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर कितीही टीका होत असली तरीदेखील त्याचा परिणाम तिच्यावर होत नसल्याचे दिसतं. त्यामुळेच तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ती नेहमीच भडक कपड्यांमध्ये दिसत असते. त्यामुळे आपोआपच तिच्याविषयी चर्चा रंगू लागतात.

काही दिवसांपूर्वी अमिषा तिच्याच प्रॉडक्शन हाऊसच्या 'देसी मॅजिक' या सिनेमाच्या लाँचिंग इवेंटला दिसली. या कार्यक्रमात अमिषा अशा काही ड्रेसमध्ये दिसली, जो कदाचित बेडरुममध्ये घालण्यासाठी योग्य असावा. मात्र अमिषाला हे कळले नसावे. कितीही टीका झाली तरीदेखील अमिषा उत्तेजक ड्रेस परिधान करत असते.

आता हेच बघा ना, गुरुवारी ऋतिक रोशनची मेव्हणी फराह खानने ज्वेलरी स्टोअर लाँचच्या आनंदात एक जंगी पार्टी आयोजित केली होती. यावेळी अमिषाने निळ्या रंगाचा टाईट बॉडी फिटिंग ड्रेस घातला होता. हा ड्रेस खूपच एक्स्पोजिंग होता. अमिषा मात्र या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल दिसत होती. एकंदरीतच पब्लिसिटी मिळवण्यासाठी कशा पद्धतीचे ड्रेस घालायला हवे, हे चांगलेच ठाऊक झाले आहे.