आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषाला सेक्सी पोशाखाची चटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिषा पटेलने या वर्षाची सुरुवात ‘रेस 2’ मधून केली. तर या शुक्रवारी तिचा 'शॉर्टकट रोमिओ' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचा प्रचार तिने जीव लावून केला. या सिनेमात ती पहिल्यादांच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. एकेवेळी आपल्या रूपाबरोबरच दमदार भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्‍या अमिषाने सध्या आपली रणनीती बदलली आहे.

यावर्षी अमिषाचे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 38 वर्षांची अमिषा दीर्घकाळ सिनेमात राहू इच्छित आहे. त्यामुळेच ती आपल्या लावण्याचा जोरात वापर करत आहे. कुठली पार्टी असो की सिनेमाचे प्रमोशन अमिषा प्रत्येक पार्टीत बोल्ड पोशाख घालून जात आहे. याबरोबरच ती 'रेस 2' मध्ये खूप ग्लॅमरस दिसली आणि 'शॉर्टकट रोमिओ'मध्येसुद्धा ती ग्लॅमर दिसणार आहे. तर येणार्‍या ‘रन भोला रन’ आणि ‘भैयाजी सुपरहिट’ मध्ये तिचे काही बोल्ड सीन्स आहेत. अलीकडेच तिच्या 38व्या वाढदिवसाच्या पार्टीतसुद्धा ती असाच एक पोशाख घालून आली होती.

अमिषा चित्रपट निर्मितीतदेखील नशीब आजमावत आहे. तिच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘देसी मॅजिक’मध्ये ती एका वेश्येची भूमिका करत आहे. इंडस्ट्रीत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी अमिषाचा हा फंडा तिला किती यश मिळवून देतो हे पाहावे लागेल.