Home »Top Story» Amit Sethi From Bhopal Become Aditi Rao Hydairi Valentine

PHOTOS : भोपाळच्या अमित सेठीला मिळाली आदितीबरोबर डेटवर जाण्याची संधी

भास्कर नेटवर्क | Feb 14, 2013, 18:05 PM IST


नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री आदिती रावने dainikbhaskar.comचे वाचक अमित सेठीची आपला व्हॅलेंटाइन म्हणून निवड केली आहे. भोपाळच्या ओरियंटल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारा अमित सेठी चार तरुणांना मागे टाकत आदितीला इम्प्रेस करण्यात यशस्वी ठरला आहे. dainikbhaskar.comच्या 'लाइन मारो कॉन्टेस्ट'मध्ये स्पर्धकांना हटके अंदाजमध्ये आदितीला इम्प्रेस करायचे होते. 'मर्डर 3'ची अभिनेत्री आदिती राव हैदरीला अमितचा साधा अंदाज पसंत पडला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांना गीतांजली ज्वेल्सकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.


गुरुवारी नवी दिल्लीत या स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेता ठरलेल्या अमितने सांगितले की, हा व्हॅलेंटाइन त्याच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल व्हॅलेंटाइन डे ठरला आहे. हा दिवस तो कधीच विसरु शकत नाही. तर 'ये साली जिंदगी', 'लंदन न्युयॉर्क पेरीस' आणि 'मर्डर 3' या सिनेमात झळकलेल्या आदितीने अमितचा साधेपणा भावला असल्याचे सांगितले.


या कॉन्टेस्टमध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी आपला सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन चाललेल्या या कॉन्टेस्टमध्ये सात हजारांपेक्षा जास्त एन्ट्री पाठवण्यात आल्या होत्या. अंतिम फेरीत भोपाळच्या अमितबरोबरच जयपूर येथील बासू सारस्वत, अहमदाबादचे कृपार्थ ठुंमर, चंदीगडचे दीप गंभीर आणि चंदीगडच्याच क्षितिज कोहलीचा समावेश होता. या अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धकांमध्ये तीन राऊंड रंगले. पहिल्या राऊंडमध्ये अमितने आदितीला फूल देऊन म्हटले की, ''मी कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचा असल्यामुळे मला दररोज कॉम्प्युटरवर काम करावे लागते. कीबोर्डवर जेव्हा मी U आणि I हे अल्फाबेट एकत्र बघतो तेव्हा मला खूप आनंद होतो.''


दुस-या राऊंडमध्ये अमितने आदितीला डेडिकेट करत 'रेस' सिनेमातील 'पहली नजर में कैसा जादू कर दिया... तेरा बन बैठा मेरा जिया...' हे गाणे गायले. यानंतर मात्र अमित जास्त वेळ आदितीबरोबर डान्स करु शकला नाही. त्यामुळेच आदितीने विजेत्याच्या रुपात अमितची निवड केली. आदितीने सांगितले की, अमितने कोणताही दिखावा केला नाही. त्याची हीच गोष्ट मला भावली.


या कॉन्टेस्टच्या दुस-या राऊंडमध्ये चंदीगडच्या दीप गंभीरने आदितीसाठी 'आंखो में तेरी अजब सी अदाएं है...' हे गाणे गायले. तर क्षितिजने 'एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे...' हे गाणे गाऊन आदितीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला.
आदितीनेसुद्धा ही कॉन्टेस्ट भरपूर एन्जॉय करत म्हटले की, तुम्हाला जेव्हा एवढे प्रेम मिळत असेल तर आनंद होणे स्वाभाविकच आहे.

'ये साली जिंदगी' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारी आदिती आगामी 'मर्डर 3' या सिनेमात रणदीप हुड्डाबरोबर झळकणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या कॉन्टेस्टची ही खास छायाचित्रे...

Next Article

Recommended