आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh, Abhishek, Aishwarya & Aaradhya Bachchan Wave To Fans

बिग बींबरोबर आराध्याला बघून चाहते झाले खुश, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या केवळ दीड वर्षांची आहे. मात्र एवढ्या कमी वयातसुद्धा प्रसिद्धीचे वलय तिच्याभोवती आहे. बच्चन कुटुंबीयांतील इतर सदस्यांप्रमाणेच तिलासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे..
अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुंबई स्थित जलसा बंगल्याबाहेर येऊन आपल्या हजारो चाहत्यांना हात दाखवून अभिवादन केले. त्याचवेळी त्यांची सून ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेक आराध्याला घेऊन आले. बच्चन कुटुंबाला एकत्र बघून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बच्चन कुटुंबीयांनी चाहत्यांना हात दाखवून त्यांचे आभार मानले.
यावेळी आराध्यासुद्धा खूप आनंदात दिसली. बिग बींनी यावेळी क्लिक झालेली छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर शेअर केली आहेत.
तुम्हीही बघा ही छायाचित्रे...