आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bacchan Is Fan Of Ram Kapoor And Sakhi Tanwar

\'बडे अच्छे लगते है\'मधील साक्षी आहे बिग बींची फेव्हरेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमिताभ बच्चन लवकरच एका फिक्शन सीरिअलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बिग बी मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर येणार असल्याचे समोर आल्यापासून त्यांना टीव्हीशी निगडीत अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
बिग बींना त्यांच्या आवडत्या मालिकेबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, सोनी वाहिनीवरील 'बडे अच्छे लगते है' ही मालिका ते बघतात आणि या मालिकेतील मेन लीडमध्ये असलेली साक्षी तन्वर त्यांची आवडती अभिनेत्री आहे. याशिवाय राम कपूरलासुद्धा ते पसंत करतात. याचे एक कारण म्हणजे बिग बी आणि राम कपूर एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत.
मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देताना बिग बींचे आपल्या सीरिअलची विश्वासहार्यता जपण्याकडे विशेष लक्ष होते.
सोनी टीव्हीवरच बिग बींची नवी मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे इतर वाहिनींवर सुरु असलेल्या मालिकांबद्दल बोलणे त्यांनी कटाक्षाने टाळले.