आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋतिकच्या सिनेमाला दमदार बनवणार बिग बी, क्रिश-3 दिला वॉईस ओव्हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार्‍या सुपरहीरो ‘क्रिश-3’ सिनेमाची प्रस्तावना अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात केली आहे.

आपल्या सिनेमाची प्रस्तावना अमिताभ बच्चन यांच्याकडून करून घेण्यासाठी दिग्दर्शक नेहमीच आतुर असतात. ‘लगान’साठीदेखील आशुतोष गोवारीकरने त्यांच्याकडून प्रस्तावना करून घेतली होती आणि सिनेमाला घवघवीत यश मिळाले. याबरोबरच आशुतोषने ऋतिक अभिनीत ‘जोधा अकबर’मध्येसुद्धा त्यांच्याकडून नरेशन करून घेतले होते. आता राकेश रोशन यांनी आपल्या येणार्‍या सुपरहीरो ‘क्रिश-3’ मध्ये प्रस्तावना करून घेतली आहे.