आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan, Aishwarya Rai, Abhishek Support Social Cause

SOCIAL CAUSEसाठी समोर आले बच्चन कुटुंबीय, पाहा छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच आपल्या जलसा बंगल्यावर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी 'बी 70' हे पुस्तक लाँच करण्यात आले. या पुस्तकात भारतातील प्रसिद्ध कलाकारांनी काढलेली 70 पेटिंग्स आहेत.
या पुस्तक विक्रीतून जमा झालेले पैसे 'गर्ल चाईल्ड' विकासासाठी वापरण्यात येणार आहे. बिग बींना प्लान इंडियासाठी 25 लाखांचा चेकही यावेळी दान दिला.
बिग बींनी यासंदर्भात ट्विट केले की, ''सहसा मी चॅरिटी करताना गाजावाजा करत नाही. मात्र सध्या देशात महिलांवरील अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे असे करणे गरजेचे होते. या उपक्रमात लोकांचाही सहभाग वाढेल अशी आशा आहे.''
अमिताभ यांच्याबरोबर यावेळी जया, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनही हजर होते.
पाहा या पत्रकार परिषदेदरम्यानची ही खास छायाचित्रे...