आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan And Jaya Bachchan's 40th Wedding Anniversary

बिग बी-जया बच्चनच्या लग्नाचा 40वा वाढदिवस, बिग बी रमले आठवणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आज (3 जून) अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाचा चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी या खास दिवसाचा उल्लेख त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर केला आहे.
बिग बींनी ट्विटरवर लिहिले की, ''आज माझ्या आणि जयाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत. ही चाळीस वर्षे खूपच अद्भूत राहिली. कुटुंबीय आम्हाला शुभेच्छा देत आहेत. मी खूप आनंदी आहे. या खास दिवशी मी भूतकाळातील त्या सुखद आठवणीत रमलोय. त्यामुळे या दिवसाचा उल्लेख आपल्या ब्लॉगवर केल्याशिवाय मला चैन पडले नाही. सध्या माझे कुटुंब न्यूयॉर्कमध्ये आहे, त्यामुळे मी एकटाच या आठवणीत रमलोय.''
बिग बी आणि जया बच्चन यांना आमच्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर याच निमित्ताने बघा बिग बी आणि जया बच्चन यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...