आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंनी बिग बींचे पाय धरुन मागितली माफी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/भास्कर न्यूज - ''अमिताभ बच्चन एखाद्या राज्याचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे ब्रॅण्ड अँम्बेसड आहेत. अलाहाबादच्या लोकांचे त्यांच्यावर जेवढे प्रेम आहे, तितकेच प्रेम महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस त्यांच्यावर करतो. बॉलिवूडमध्ये गेल्या शंभर वर्षांत अमिताभ बच्चन यांच्यासारखा मोठा कलाकार झाला नाही आणि पुढेही होणार नाही. अशी माणसे देवाने पाठवलेली असतात'', अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती केली.
महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी चित्रपट सेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात सोमवारी हे मनोमिलन झाले. सेनेचा 7 वा वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. राजकारण आणि बॉलिवूडमधील दोन अँग्री यंग मॅन एका व्यासपीठावर येण्याचा योग यानिमित्ताने घडला.
'झाले गेले गंगेला मिळाले, माझ्यात आणि अमितजींमध्ये मागील दिवसांत जे काही झाले, ते माझे त्यांच्याशी असलेले वैयक्तिक भांडण नव्हते. मात्र मराठीच्या मुद्दय़ावर मी आजही ठाम आहे'', असे सांगत राज ठाकरे यांनी अमिताभ यांच्याशी सहा वर्षांपासून असलेली कटुताही संपवून टाकली.
हिंदी भाषा फार गोड भाषा आहे. वाजपेयींनंतर इतकी चांगली हिंदी मी अमिताभ यांच्याकडूनच ऐकली, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
सचिनच्या पार्टीत झाली होती अमिताभ आणि राज यांची भेट...
राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांची सोमवारी झालेल्या या कार्यक्रमापूर्वी दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी भेट झाली होती. याविषयी राज ठाकरे यांनी सांगितले, की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आजारी असताना अमिताभ त्यांना भेटायला आले होते. तेव्हा आमची भेट झाली होती. याशिवाय सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर अंजली तेंडुलकरने आयोजित केलेल्या पार्टीतदेखील अमितजींना भेटल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
अमिताभ यांनी केली राज ठाकरे यांची प्रशंसा...
राज ठाकरे आणि अमिताभ सोमवारी एका मंचावर आले होते. यावेळी अमिताभ यांनी चक्क मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपल्या भाषणात सिनेकलावंतांसाठी विमा पॉलिसीचा शुभारंभ केल्याबद्दल अमिताभ यांनी राज ठाकरे यांचे कौतूक केले.
मनसेला भविष्यात चांगल्या कामासाठी जर माझी मदत लागली तर त्यांनी हक्काने आवाज द्यावा, मी नक्कीच येईन, असंही बिग बी म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी अमिताभ बच्चन यांचे पाय धरले आणि सगळ्यांसमोर माफीदेखील मागितली. हे बघून तेथे उपस्थित सर्वजण अचंबित झाले. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अमिताभ-राज यांची ही खास छायाचित्रे...