बॉलिवूडचे महानायक
अमिताभ बच्चन 'लावासा वुमेन्स ड्राइव्ह 2014'च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये सामील झाले होते. ललित हॉटेलमध्ये आयोजित झालेल्या कार्यक्रमात बिग बींनी अनेक महिलांना सन्मानित केले. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मासुध्दा दिसली.
बिग बींच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली होती. लावासा कॉर्पोरेशन लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुरुध्द परासकरसुध्दा या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी अमिताभ यांना एक आर्ट पेंटिंग भेट म्हणून दिली. त्या पेंटिंग अमिताभ बच्चनचे छायाचित्रे होते. या कार्यक्रमात बिग बींनी एका पोलिस कर्मचारीसह विविध क्षेत्रात निपूण असलेल्या महिलांना सन्मानित केल.
कार्यक्रमात गायिका हार्ड कौरने कार्यक्रमाच्या स्टेजवर परफॉर्म करून शोभा वाढवली. अभिनेत्री नेहा शर्मा बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली. लावासा ग्रुप प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिलांचा सन्मान करतात.
लावासा वुमेन्स ड्राइव्ह 2014च्या कार्यक्रमाची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...