आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी ट्रिपल रोल करण्यासाठी दिला नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बिग बी अमिताभ बच्चन यांनी निर्माता वाशू भगनानीच्या 'हमशक्ल' या सिनेमासाठी त्यांना ऑफर करण्यात आलेली भूमिका नाकारली आहे. सिनेमाच्या पटकथेनुसार या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा ट्रिपल रोल होता. अमिताभ यांच्यासह सैफ अली खान आणि रितेश देशमुख यांचेही या सिनेमात ट्रिपल रोल आहेत.
तसं पाहता अमिताभ यांनी वाशू भगनानीच्या 'बडे मिया छोटे मिया' या सिनेमात डबल रोल साकारला होता. मात्र ट्रिपल रोलबद्दल बिग बींचा वेगळा विचार आहे. यापूर्वी ऐंशीच्या दशकात बिग बींनी 'महान' या सिनेमात तिघेरी भूमिका साकारली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता.
दिलीप कुमार हे देखील 'बैराग' या सिनेमात ट्रिपल रोलमध्ये झळकले होते. त्यांचाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. बिग बींच्या मते, ट्रिपल रोल प्रेक्षकांना खिळवून ठेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा नाकारला.
अमिताभ बच्चन यांच्या नकारामुळे अभिनेता बोमन इराणीला मात्र फायदा झालेला दिसतोय. साजिद खान दिग्दर्शित या सिनेमात आता बोमन इराणी ट्रिपल रोमध्ये झळकणार आहे. सोबतच सैफ आणि रितेशसुद्धा आपल्या ट्रिपल रोलमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.