आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी 50 कोटीला विकत घेतला पाचवा आलिशान बंगला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथे नुकताच एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. अमिताभ यांच्या जुहू स्थित जलसा बंगल्याशेजारीच हा नवा बंगला आहे. अमिताभ यांचा हा बंगला आठ हजार चौरस फूटांचा असून त्याची किंमत तब्बल 50 कोटी इतकी आहे. अमिताभ यांचा हा पाचवा बंगला आहे.

अमिताभ बच्चन यांच्याकडे प्रतीक्षा, जलसा, जनक, वस्त असे यापूर्वीचे चार बंगले आहेत. नुकत्याच घेतलेल्या या नव्या बंगल्याचे अमिताभ यांनी अद्याप नाव ठेवलेले नाही. जलसाच्या मागील भागात हा बंगला आहे, जलसा आणि या नव्या बंगल्यामध्ये एकच भिंत आहे. ती पाडून दोन्ही बंगल्यांचा एकच विस्तीर्ण बंगला बनविण्याचा अमिताभ यांचा विचार असल्याचे समजते.

खरं तर बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी आपले बंगले बिल्डरांना विकून त्यांच्याकडून मोठी रक्कम मिळवली आणि त्यातून काही फ्लॅट्स विकत घेतले. अमिताभ बच्चन मात्र त्याला अपवाद आहेत. अमिताभ यांनी आपले जुने बंगले न विकता आपल्या बंगल्यांची संख्या वाढवली आहे.

अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या वयातही अमिताभ मोठ्या पडद्याबरोबरच छोट्या पडद्यावरही कार्यरत आहेत. दिग्दर्शक आर. बाल्की अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या एका रोमँटिक सिनेमाची तयारी करत आहेत. तर दिग्दर्शक सुधीर मिश्रासुद्धा यावर्षाच्या अखेरपर्यंत बिग बींना घेऊन 'मेहरुनिसा' या सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहेत. लवकरच त्यांचा 'सत्याग्रह' हा सिनेमाही रिलीज होणार आहे. अमिताभ बच्चन कमाईमध्ये आपल्या समवयीन कलाकारांना मागे टाकत आहेत. अमिताभ आपल्या प्रत्येक सिनेमासाठी जवळपास पाच ते सहा कोटींचे मानधन घेतात. मात्र त्यांच्या समवयीन कलाकारांना त्यांच्या तुलनेत कमी मानधन मिळतं.

साठी पार केलेले ऋषी कपूर आणि मिथून चक्रवर्ती हे कलाकारदेखील सध्या खूप बिझी आहेत. मात्र या दोघांना बिग बींपेक्षा कमी मानधन मिळतं. ऋषी कपूर यांना आपल्या प्रत्येक सिनेमासाठी दोन कोटी इतके मानधन मिळतं. तर मिथून दा एका सिनेमासाठी एक कोटी रुपये घेतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बिग बींच्या बंगल्यांबद्दल...