आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan News In Marathi, Anti Magic Act, Bollywood

जाहिरातीमुळे अमिताभ बच्चन जादूटोणा कायद्याच्या कचाट्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अभिनेता अमिताभ बच्चन एका जाहिरातीमुळे जादूटोणाविरोधी कायद्याच्या कचाट्यात अडकले असून, त्यांच्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल झाली आहे. कॉम्प्लॅन पावडर दुधातून घेणा-या व्यक्तीत भुतासारखी शक्ती संचारते, असे जाहिरातीत दाखवले आहे. यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असल्याचा आरोप याचिकेत आहे.

राजेंद्र सोनार (50, ) यांनी अमिताभ यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. यावर 7 एप्रिल रोजी पुढील सुनावणी आहे. कायद्यानुसार अमानवी शक्ती अस्तित्वात असल्याचे भासवून फसवणूक करणे, अभासी गोष्टी दाखवून उत्पादन विक्री करणे गुन्हा ठरतो.