आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : विद्या, प्रियांकासह या अभिनेत्रींना मिळाला बिग बींकडून गोडगोड पापा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच पार पडलेल्या स्टारडस्ट अवॉर्ड सोहळ्यात एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट केली. या अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ यांना ‘स्टार ऑफ द सेंच्युरी’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बिग बींनी स्टेजवर घोषणा केली त्यांना ‘कीस’ करायची.

हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, बिपाशा बसू, फराह खान, विद्या बालन यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्टेजकडे धाव घेतली. बिग बींनी या अभिनेत्रींच्या गालावर किस केले.

बिग बींनी ट्विटरसुद्धा याचा उल्लेख केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘खूपच छान दिवस होता. विद्या, प्रियांका, फराह, बिपाशा आणि अनुष्का या सगळ्यांना मी माझा लाड दिला.’ आज आम्ही तुम्हाला या क्षणाची खास छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अभिनेत्रींना किस करतानाची बिग बींची ही खास छायाचित्रे...