आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV पत्रकाराच्या मुलाखतीनंतर अमिताभ म्हणाले, मार-मार के चटनी बना दी मेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवुडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी एका टीव्ही पत्रकाराच्या मुलाखतीनंतर मीडियाला फेस करणे आता सोपे काम राहिले नाही असे म्हटले आहे. बच्चन यांनी फेसबुक आणि ट्विटर याच्याशिवाय आपल्या ब्लॉगमध्ये या मुलाखतीदरम्यानचा अनुभव सांगितला आहे. त्यात बच्चन म्हणतात की, ''मार-मार के चटनी बना दी आज मेरी। बहुत पीटा, और पीट-पीट के हालत खराब कर दी!!'' बच्चन यांनी या मुलाखतीदरम्यानची छायाचित्रेही आपल्या फॅन्ससाठी शेअर केली आहेत.
मीडिया-जर्नालिस्ट नेहमीच जिंकतात-
अमिताभ यांनी गुरुवारी रात्री आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, मिडियाला फेस करणे सोपे काम नाही. ते म्हणतात, संपूर्ण दिवस पत्रकारासोबत घालवला. विशेष म्हणजे या दरम्यान प्रश्नांच्या सरबत्तीने मला भेडसावून ठेवले. खिसून खिसून माझाय ज्यूसच केला. मीडिया नेहमीच जिंकते. पत्रकारही कायम जिंकतात. आम्ही लोकांना मात्र केवळ पिसले जाते. आपण हारून जातो आणि त्या सीटवर दबून बसतो आणि वाट पाहतो की, कधी एकदा संपेल हे सारे निवांतपणे स्वच्छ व ताजा श्वास घ्यायला.
विनम्र राहण्यातच तुमचे हित-
अमिताभ पुढे लिहतात, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सामना करणे सोपे नाही. तुम्ही येथून कधीच जिंकून येत नाही. कधीच शक्यही नाही. अशा वेळी एकच मंत्र की जितके शक्य आहे तितके विन्रम बोला व वागा. पुढे तुम्ही एवढीच आशा ठेवा की हा जो जेटलमन अथवा लेडी आपली मुलाखत घेत आहे ती लेख लिहताना किंवा टीव्हीवर दाखवताना थोडे प्रभावित व्हावेत.
'तुम्हाला फाडून टाकतात पत्रकार'-
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये पुढे म्हटले आहे की, मात्र हो, जेव्हा तुम्ही त्यांनी घेतलेली मुलाखत पाहता, लेख वाचता तेव्हा त्याचा आशय व त्याचा अन्वयार्थ तुम्हाला आनंदित करतो. मात्र त्यापूर्वी ते तुम्हाला फाडून खातात व उचलून उचलून आपटवतात. त्यांच्याजवळ ही क्षमता असते की तुम्हाला गोळीबाराच्या मध्ये उभा करतात आणि गोळी लागण्याची वाट पाहतात.
बच्चन लिहतात, ''अर्णब गोस्वामी (एक इंग्रजी टीव्हीचे पत्रकार) यांनी माझ्यासोबत असेच काहीसे केले. मला सहज त्यांनी फाडून खाल्ले. काहीही सहानुभूती नाही. सगळ्यात वेगाने सर्वच प्रश्नांचा सामना केला. मी त्यापेक्षा आणखी काय करणार होतो? तुम्ही जेव्हा त्यांच्या काही इंचाच्या अंतरावर बसलेला असता तेव्हा खरं तर श्वास घेणेही अवघड होऊन जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुलाखतीनंतर अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियावर शेयर केलेले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...