बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते
अमिताभ बच्चन यांचा 'भूतनाथ रिटर्न्स' सिनेमाची लोक आतुरतेने वाट बघत आहेत. हा सिनेमा 2008मध्ये रिलीज झालेल्या 'भूतनाथ' सिनेमाचा सिक्वेल आहे. अलीकडेच या सिनेमाच्या एका गाण्याची झलक समोर आली आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन डान्स करताना दिसत आहेत.
गाण्यामध्ये अमिताभ गर्दीसोबत पाय हलवून त्यांच्या अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. सुत्रांच्या सांगण्यानुसार, अमिताभ बच्चन सध्या 'भूतनाथ रिटर्न्स'ची शुटिंग करण्यात व्यस्त आहेत.
या सिनेमात निर्मात्यांनी
रणबीर कपूरला सुध्दा घेतले आहे. त्याची भूमिका
शाहरुख खानसारखी नसून, तो सिनेमातील एक आयटम नंबर करणार आहे.
बोमन ईरानी या सिनेमात एक महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यांच्याव्यतिरिक्त जूही चावला आणि मराठी अभिनेत्री उषा जाधवसुध्दा सिनेमात दिसणार आहेत.
हा सिनेमा भूषण कुमार आणि अभय चोप्रा यांनी निर्मित केला आहे. सिनेमातील गाण्यांना विशाल-शेखर आणि सलीम-सुलेमान यांनी संगीत दिले आहे. 'भूतनाथ रिटर्न्स' एप्रिल 2014मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा केली जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'भूतनाथ रिटर्न्स' सिनेमाच्या सेटवरील काही छायाचित्रे...