आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan's Exit Is Rekha's Entry At Mai's Premier

PICS: अमिताभशी सामना होऊ नये म्हणून, रेखाने केली अशी युक्ती!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीडिया गॉसिप्सपासून दूर राहण्यासाठी सेलिब्रेटींना वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग कराव्या लागतात. बॉलिवूडमधील चर्चित राहिलेले कपल अमिताभ बच्चन आणि रेखा या दोघांनाही गुरुवारी रात्री आशा भोसलेंच्या 'माई' चित्रपटाच्या प्रिमिअरमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष प्लॅनिंग करावे लागले. मीडियाच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी हे दोघे वेग-वेगळ्या वेळी प्रिमिअरच्या ठिकाणी पोहचले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आशा भोसलेंची प्रमुख भूमिका असलेल्या 'माई' प्रिमिअरच्या आयोजकांच्या संपर्कात होती. रेखाने आयोजकांच्या मदतीने असे टाइम मॅनेजमेंट केले की, तिचा सामना बिग बींशी होऊ नये.

यावरून हे स्पष्ट होते की, रेखाने मीडियाची फोटोग्राफी आणि चर्चेपासून दूर राहण्यासाठी असे केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन वेळेचे खूप पाबंद आहेत. ते ठीक 9.05 मिनिटांनी प्रिमिअरच्या ठिकाणी पोहचले आणि 9.35 मिनिटांनी तेथून निघून गेले.

रेखा प्रिमिअरच्या ठिकाणी उशिरा पोहचली. रेखा 9.47 मिनिटांनी आली व आशा भोसलेंना भेटून 10.45 मिनिटांनी निघून गेली.

पुढील फोटोंमध्ये पाहा 'माई'च्या प्रिमिअरमध्ये रेखा आणि अमिताभ...