आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराध्याला आयपॅडसोबत खेळताना पाहून बिग बी अचंबित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन केवळ चौदा महिन्यांची आहे. मात्र तिच्या करामती बघून घरातील सगळेच जण अचंबित झाले आहेत.

बिग बींनी आपल्या ट्विटरवर ट्विट केले की, ''आराध्या स्वतः आयपॅड सुरु करते आणि त्यावर तिची आवडती गाणी ऐकते. इतकेच नाही तर आराध्याला टीव्हीचा रिमोट दिसला तर ती इशा-याने टीव्ही सुरु करायला सांगते.''
बिग बींनी सांगितले की, ''आजची जनरेशनल मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरते. त्यामुळे मी खूश आहे. आजची पिढी खूपच हुशार आहे.''

विशेष म्हणजे स्वतः बिग बी टेक्नॉलॉजीबद्दल सतत जाणून घेत असतात. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता नातसुद्धा आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे, असेच म्हणावे लागेल.