आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh, Hrithik, Akshay Pay A Heavy Price As Juhu Residents

अमिताभ, अजयसह या स्टार्सच्या घरी येतंय दुषित पाणी, पसरतोय आजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या जुहू परिसरात राहणारे बॉलिवूड स्टार्स सध्या एका समस्येला सामोरे जात आहेत. हो खरेच, ही गोष्ट थोडी विचित्र आहे, परंतु खरी आहे. असे नाहीये, की मुंबईमधील स्लमएरियामध्ये राहणा-या लोकांनाच दुषित पाण्यामुळे आजारांचा सामाना करावा लागतो, बॉलिवूड स्टार्ससुध्दा या दुषित पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, मुंबईच्या जुहू परिसरात राहणारे बॉलिवूड स्टार्स जसे, अमिताभ बच्चन, आदित्य चोप्रा, अजय देवगण, धर्मेंद्र, हेमामालिनी, अक्षय कुमार, हृतिक रोशन आणि शिल्पा शेट्टी अलीकडे नेहमीच आजारी पडत आहेत. एवढेच नाही तर, जानेवारी महिन्यात धर्मेंद्र आणि अजय देवगण यांच्या कुटुंबातील सदस्यांना पाण्यामुळे आजारांना सामोरे जावे लागले होते.
या स्टार्सच्या घरी दुषित पाणीपुरवठा झाल्याने त्यांना ताप, व्हायरल, पोटात इन्फेक्शन आणि डायरिआसारख्या आजारांचा सामना करावा लागला. तसेच, जुहूमधील रहिवाशांनासुध्दा या आजारांची लागण होत आहे. बॉलिवूडच्या या स्टार्सच्या शेजारी राहणा-या काही लोकांनासुध्दा पोटांच्या आजारांची लागण झाली आणि त्यांना हॉस्पिटमध्येसुध्दा दाखल करण्यात आले आहे.
स्टार्सच्या संबंधीत सुत्रांनी सांगितले, की इथे ड्रेनेज लीकेज झाले होते, ज्यामुळे ड्रेनेजचे दुषित पाणी मुख्य पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइमध्ये मिसळल्या गेले आणि लोक आजारी पडायला लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या स्टार्सचे कसे होऊ शकते नुकसान...