आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजचा शुक्रवार हा दिवस बॉलिवूडसाठी खूपच महत्त्वाचा आहे. आज तीन हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कमल हसनच्या 'विश्वरुपम' आणि निल नितीन मुकेशच्या 'डेविड' या सिनेमांबरोबर आशा भोसलेंची प्रमुख भूमिका असलेला 'माई' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
महेश कोदियाल दिग्दर्शित 'माई' हा आशाताईंचा अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा आहे. पद्मिनी कोल्हापुरे आणि राम कपूर आशाताईंबरोबर या सिनेमात दिसणार आहेत.
'माई' ही एल्जाइमर या आजाराने त्रस्त असलेल्या एका आईची कहाणी आहे. परदेशात नोकरी लागल्यामुळे मुलगा आपल्या आईला सोबत घेऊन जात नाही. दोन्ही मुली आपल्या आईची जबाबदारी घेण्यास नकार देतात. मात्र मोठी मुलगी पती आणि मुलीचा विरोध झुगारुन आपल्या आईला सोबत ठेवते. जसजसा माईचा आजार वाढत जातो, तसतसा त्यांची मुलगी आणि जावई यांच्यातला तणावही वाढतो. मात्र एक वेळ अशी येते जेव्हा जावईसुद्धा माईच्या बाजूने खंबीर उभा राहतो.
या सिनेमातील 'माई' ही शीर्षक भूमिका आशा भोसले यांनी साकारली आहे. तर पद्मिनी कोल्हापुरे आणि राम कपूर त्यांच्या मुलगी आणि जावईच्या भूमिकेत आहेत.
अलीकडेच या सिनेमाचा खास प्रीमिअर बॉलिवूडच्या कलाकारांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमिताभ बच्चन, रेखा, जॅकी श्रॉफ, माला सिन्हा, काजोल यांच्यासह अनेक मान्यवरांनी हा सिनेमा बघितला आणि आशा ताईंच्या अभिनयाचे कौतूक केले.
या प्रीमिअरला आशा भोसले यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर, बहीण उषा मंगेशकर यांनीही हजेरी लावली होती. मात्र लता दीदी या प्रीमिअरला अनुपस्थित होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा माईच्या ग्लॅमरस प्रीमिअरची खास क्षणचित्रे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.