अमोल गुप्ते स्वत:च्या दिग्दर्शनाखाली बनवत असलेल्या 'हवा हवाई' सिनेमात एक भूमिका साकारणार होता. परंतु आता त्याने ती भूमिका सिनेमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रोहित शेट्टीच्या सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेवर त्याला लक्ष केंद्रीत करायचे आहे.
मागील वर्षी त्याला इंद्र कुमारचा 'ग्रँड मस्ती', कैजाद गुस्तादचा 'जॅकपॉट' आणि मोहित सुरीचा 'विलेन' या सिनेमांचे ऑफर आले होते, परंतु तो 'हवा हवाई' सिनेमात व्यस्त होता. म्हणून त्याने सर्व ऑफरला नकार दिला होती.
अमोलचा 'हवा हवाई' एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची कथा रोलर-स्केटींग प्रक्षिशक (साकिब सलीम) आणि त्याच्या शिष्याची (पार्थो गुप्ते) आहे. सिनेमात अमोलनेसुध्दा भूमिका साकारली आहे, परंतु त्याने त्याच्या भूमिकेचे फुटेज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण असे आहे, की रोहित शेट्टीच्या 'सिंघम 2'मध्ये तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या भूमिके पुढे त्याला त्याच्या सिनेमातील छोटी भूमिका आवडली नाही.
अमोलने सांगितले, 'मी माझ्या सिनेमातील भूमिका काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मला त्या सिनेमातील भूमिके पुढे माझ्या सिनेमातील भूमिका खूपच छोटी वाटली. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.' आता तो रोहित शेट्टीच्या सिनेमात एक खलनायकाची भूमिका साकारणार आहे आणि तो त्याच्या तयारीला लागला आहे. मागच्या वर्षी प्रकृती संबंधीच्या समस्येमुळे अमोलचे बरेच वजन कमी झाले होते. परंतु सिनेमात तो तंदुरुस्त दिसायला हवा, यासाठी सध्या तो विशेषतज्ञांच्या सल्ल्याने वजन वाढवत आहे.