आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता वाजले की बारा... म्हणत मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवणारी अमृता आता झाली आहे हिंदीतील आयटम गर्ल. आगामी 'हिम्मतवाला' या सिनेमात आयटम साँग करण्याची संधी अमृताला मिळाली आहे. या आयटम साँगमध्ये अमृताने अजय देवगणबरोबर ताल धरला आहे.
हिंदीतल्या अनेक आयटम गर्ल्सना मागे टाकत अजयबरोबर आयटम साँग करण्याची संधी अमृताने पटकावली. हिंदीत आयटम नंबर्सची चलती असताना आयटम गर्ल म्हणून चमकण्याची संधी मिळाल्यामुळे अमृता सॉल्लिड खूश आहे.
'धोका धोका...' हे शब्द असलेल्या या आयटम साँगचे वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यात अमृताबरोबर पंजाबी, गुजराथी, भोजपूरी, बंगाली आणि पंजाबी सिनेमांमधील नावाजलेल्या अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. मराठीत अमृता खानविलकर, बंगाली अभिनेत्री शयंती घोष, गुजराती अभिनेत्री मोना थीबा, भोजपूरी अभिनेत्री रिंकू घोष आणि पंजाबी अभिनेत्री सुरबीन चावला यांनी देसी ठुमक्यांवर मस्त ताल धरला आहे. वेगवेगळ्या संस्कृतींचं दर्शन या गाण्यात प्रेक्षकांना घडणार आहे. अमृता या संपूर्ण गाण्यात घागरा चोलीत बघायला मिळत आहे.
साजिद-वाजिद या आजच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने या गाण्याला संगीत दिलंय. हैद्राबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये हे गाणे शूट करण्यात आले. गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरिओग्राफ केले असून
तर बप्पी लाहिरी, सुनिधी चौहान आणि ममता शर्मा यांनी हे गाणे गायिले आहे.
तसे पाहता अमृता यापूर्वीही हिंदी सिनेमांमध्ये झळकली आहे. अमृताने यापूर्वी 'मुंबई साल्सा', 'हॅटट्रिक', 'कॉन्ट्रॅक्ट', 'फूंक' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. मात्र आयटम गर्ल म्हणून ती पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चला तर अमृताचे देसी ठुमक्यांवर प्रेक्षकही ताल धरतील अशी आशा व्यक्त करुया.
अमृताचे पहिलेवहिले आयटम साँग बघण्यासाठी वरील व्हिडिओवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.