आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई’ होणार अमृता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अमृता सिंग करण जोहरच्या आगामी ‘टू स्टेट्स’ सिनेमात अर्जुन कपूरच्या आईची भूमिका करणार आहे. या सिनेमात अर्जुन एका पंजाबी मुलाच्या भूमिकेत आहे. सिनेमाची मुख्य अभिनेत्री आलिया भट्ट तामिळ मुलीच्या भूमिकेत आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. करण आणि साजिद नाडियादवाला सिनेमाचे सहनिर्माता आहेत. हा सिनेमा चेतन भगतची कांदबरी ‘टू स्टेट्स’ वर आधारित आहे.

खरं तर याआधीही अमृता सिंगने अनेक सिनेमात आईची भूमिका साकारली आहे. अमृताने संजय गुप्ताच्या ‘शूट आउट अ‍ॅट लोखंडवाला’ सिनेमात गँगस्टर मायाच्या आईची भूमिका केली होती. सिनेमात विवेक ओबेराय मायाच्या भूमिकेत होता. त्यानंतर ती ‘दस कहानियां’ मध्ये मिनिषा लांबाच्या आईच्या भूमिकेत दिसली होती.